

Heartwarming Karwa Chauth Story Husband Gives Kidney to Save Wife and Observes Nirjala Fast for Her Long Life and Happiness
esakal
प्रेम, त्याग आणि एकमेकांना दिलेली साथ यांचे उदाहरण ठरणारी कहाणी आग्रा येथील प्रियांक कुमार आणि रितू यांची आहे. पत्नीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर तिचे प्राण वाचवण्यासाठी प्रियांक यांनी स्वतःची किडनी दान केली. प्रत्यारोपणानंतर रितू यांना नियमित औषधे घेणे आवश्यक असल्याने त्यांना करवा चौथचा निर्जळी उपवास करता येत नाही. त्यामुळे २०२३ पासून प्रियांक स्वतः पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हा उपवास करत आहेत. संध्याकाळी रितू पूजेचे विधी पूर्ण करतात.