Police : बायको दिसायला सुंदर नाही म्हणून तिला ठार मारण्यासाठी नवऱ्यानं दिली हल्लेखोरांना 2 लाखांची सुपारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Crime News

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी जे सत्य सांगितलं ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Police : बायको दिसायला सुंदर नाही म्हणून तिला ठार मारण्यासाठी नवऱ्यानं दिली सुपारी

पाटणा : बिहारच्या भोजपूरमध्ये (Bihar Bhojpur) पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा पोलिसांनी दोन दिवसांत उलगडा केलाय. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी (Police) जे सत्य सांगितलं ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पत्नीच्या हत्येचा कट पतीनंच रचल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पतीनं सांगितलं की, 'माझी बायको सुंदर नाहीय, त्यामुळं तिच्या हत्येचा कट रचला गेला.' गजराजगंज पोलीस स्टेशन (Gajrajganj Police Station) हद्दीतील पकडियाबार गावात पती-पत्नीवर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलीस पथकानं कसून तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन गुन्हेगारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 1 देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं, मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केलीय.

हेही वाचा: POCSO न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांची आत्महत्या; पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

गोळीबारात पत्नीसह आरोपी पतीही गंभीर जखमी झाला

पोलिसांनी दोन्ही आरोपींची चौकशी केली असता, या गोळीबारामागं अन्य कोणी नसून महिलेच्या पतीचा हात असल्याचं निष्पन्न झालं. पती उत्तमकुमार विश्वकर्मा यानं पत्नी संध्यादेवीची हत्या करण्यासाठी सशस्त्र गुन्हेगारांना 2 लाखांची सुपारी दिली होती. सुपारी घेणाऱ्या गुन्हेगारांनी पत्नीला लक्ष्य करून गोळीबार केला होता. मात्र, या गोळीबारात पत्नीसह आरोपी पतीही गंभीर जखमी झाला होता.

हेही वाचा: Narendra Modi : दलित-आदिवासींना नरेंद्र मोदी देवासमान वाटतात : मंत्री गजेंद्र शेखावत

हायप्रोफाईल गोळीबाराचा एसपींनी केला खुलासा

या हायप्रोफाईल गोळीबाराचा खुलासा भोजपूरचे एसपी संजय कुमार सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एसपींनी सांगितलं की, 31 ऑगस्ट रोजी पती-पत्नी रात्री उशिरा रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जात होते. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डीएसपी हिमांशू कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं होतं.

हेही वाचा: ED ची भीती कुणाला दाखवता, हिंमत असेल तर अटक करून दाखवा; अभिषेक बॅनर्जींचं शहांना थेट चॅलेंज

पत्नीला मारण्यासाठी दोन लाखांची सुपारी

कसून तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं कृष्णकांत गुप्ता आणि नवनीत कुमार तिवारी यांच्या घरावर छापा टाकून हल्लेखोरांना अटक केली. चौकशीत दोन्ही नराधमांनी घटनेत सहभागी असल्याचा गुन्हा मान्य केला असून या घटनेमागं जखमी पतीचा हात असल्याचंही सांगितलं. पती उत्तमकुमार विश्वकर्मा यानं पत्नीला मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती.

Web Title: Husband Paid 2 Lakhs To The Attackers To Kill His Wife Gajrajganj Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharCrime News