
- रुग्णावर गुन्हा दाखल
- रुग्णाच्या पत्नीकडून माहिती
शिमला : कोरोना व्हायरसचे संकट असताना त्यापासून वाचण्यासाठी सर्वच पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाकडून संबंधितांना क्वारंटाईन केले जाते. पण हिमाचल प्रदेशात एक वेगळाच प्रकार घडला. क्वारंटाईन झालेला पती आपल्या पत्नीला भेटण्यासाठी घरी गेला होता.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना व्हायरसचा संसर्ग होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. भारतातही याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70 हजारांच्या वर पोचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय देशातील बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जर एखाद्या रुग्णामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली की त्याला रुग्णालयात क्वारंटाईन केले जाते. परंतु हिमाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हिमाचलमधील चंबा येथे क्वारंटाईन करण्यात आलेला रुग्ण घरी पळून गेला. क्वारंटाईन केलेला नवरा अचानक घरी आल्याने बायकोलाही मोठा धक्काच बसला. यानंतर बायकोने नवरा घरी आल्याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच रुग्णाला पुन्हा क्वारंटाईन केंद्रामध्ये दाखल केले. मात्र, हे सर्व असताना संबंधित रुग्णाच्या बायकोने वेळीच खबरदारी दाखवली त्यामुळे पोलिसांनी तिचे कौतुक केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रुग्णावर गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्ण अचानकपणे गायब झाल्याने शोधाशोध सुरु होती. मात्र, तो घरी गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित रुग्णाच्या घरी धाव घेतली. दरम्यान, या रुग्णावर क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रुग्णाच्या पत्नीकडून माहिती
संबंधित रुग्णाच्या पत्नीने पोलिसांनी याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर बनीखेत पोलिस घटनास्थळी रवाना झाले. संबंधित रुग्णाला ताब्यात घेऊन त्याला पुन्हा क्वारंटाईन केले गेले. आता पोलिसांना सुरक्षेसाठी तेथे तैनात करण्यात आले आहे. या रुग्णावर क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकारी आशिष पठानिया यांनी सांगितले.