पत्नी म्हणाली, तू फक्त नावाला नवरा म्हणून राहा...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. तुला आता समजले आहे पण, तुला राहायचे असेल तर फक्त नावाला नवरा म्हणून राहा, असे पत्नीने पतीला म्हटले होते.

सोनीपत (हरियाना): आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. तुला आता समजले आहे पण, तुला राहायचे असेल तर फक्त नावाला नवरा म्हणून राहा, असे पत्नीने पतीला म्हटले होते.

हरियाना मधील नाहरा गावामध्ये दुहेरी हत्यांकाड झाले होते. या प्रकरणाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पती चितेवर जळत असताना पत्नी प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. या रेकॉर्डिंगवरून ती अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडली. पोलिसांनी तिच्यासह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

जयसिंहचे रेखासोबत विवाह झाला होता. परंतु, रेखाला संशय होता की जयसिंहचा दुसऱया एका महिलेसोबत विवाह झाला आहे. शिवाय, रेखाचेही प्रेमसंबंध होते. या विचित्र संशयामुळे रेखाने आपल्या प्रियकरासोबत बोलून जयसिंहचा काटा काढण्याचे ठरवले होते. शिवाय, रेखाने तिचा प्रियकर नवीनसोबत विवाह केला होता. दोघांच्या विवाहाची छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर रेखाने जयसिंहला धमकी दिली. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, तुला राहायचे असेल तर फक्त नवरा म्हणून राहा, अशी म्हणाली होती.

दरम्यान, रेखाचा प्रियकर नवीन याने जयसिंहची संशयित दुसरी पत्नी गायत्रीची हत्या केली तर रेखाने जयसिंहला नशेच्या गोळ्या देऊन मारले. परंतु, जयसिंहवर अंतिम संस्कार होत असताना रेखा ही नवीनसोबत मोबाईलवरून बोलत होती, या धाग्यावरून पोलिसांनी तिला अटक केली. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी खून केल्याची कबूली दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband was having funeral wife was talking to lover at haryana