Husband-Wife : बटाट्याचा पराठा, भांडण अन्....; योगींच्या राज्यात घडली हादरवणारी घटना

प्रत्येक घरात छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत असते.
Crime news
Crime newsSakal

श्रद्धा हत्याकांड समोर आल्यानंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात रोज नव नवे खुलासे समोर येत आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

Crime news
Lazy County : सर्वात ॲक्टिव मोदींच्या देशातील नागरिक आळसावलेलेच; संशोधतून खुलासा

प्रत्येक घरात छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत असते. मात्र, अशा अनेक घटना आहेत ज्यात शुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण विकोपाला गेले आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.

त्याचे झाले असे की, उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एक दाम्पत्य वास्तव्यास होते. साधारण आठ वर्षांपूर्वी लक्ष्मण नावाच्या व्यक्तीचे बुलंदशहरमधील मुलीशी विवाह केला होता. लक्ष्मणने त्याच्या पत्नीला बटाट्याचा पराठा बनवण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्या भांडण सुरू झाले शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वाद विकोपाला गेला आणि दोघेही रागाच्या भरात घरातून बाहेर पडले.

Crime news
Shraddha Murder Case & Human Rights : अधिकार वयोमर्यादा वाढवण्यामागे भाजपचा हात?

काही वेळानंतर लक्ष्मणचा मृतदेह सिव्हिल लाईन परिसरातील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. यानंतर लक्ष्मण यांच्या नातेवाईकांनी पत्नीने तिच्या मेहुण्यासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच लक्ष्मणच्या पत्नीचे तिच्या मेव्हण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com