Super Car : हौसेला मोल नाही! पठ्ठ्यानं खरेदी केली देशातील सर्वात महागडी कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

McLaren 765 LT Spyder

Super Car : हौसेला मोल नाही! पठ्ठ्यानं खरेदी केली देशातील सर्वात महागडी कार

McLaren 765 LT Spyder : शैक बड़ी चीज़ है असं म्हणतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. असाचा काहीसा प्रकार हैदराबादमधील पठ्ठ्याने केला आहे. नासीर असे या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Viral Video : दारूड्याला चावला विषय संपला; कोब्राच्याच तोंडातून फेस निघाला

नासीर व्यावसायिक असून, त्यांनी भारतातील सर्वात महागडी कार McLaren 765 LT Spyder खरेदी केली आहे. या खरेदीमुळे McLaren 765 LT Spyder ला भारतात पहिला खरेदीदार मिळाला असल्याचे बोलले जात आहे. McLaren 765 LT Spyder ही भारतातील सर्वात महागड्या सुपरकारांपैकी एक असून, ज्याची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे.

नसीर यांनी आधीही अनेक आलिशान गाड्या घेतल्या आहेत. नासीर यांनी खरेदी केलेली कार मॅक्लारेन 765 एलटी स्पायडर श्रेणीतील आहे, ही कार या श्रेणीतील सर्वात महाग असल्याचे सांगितले जाते.

नसीर यांच्याकडे रोल्स रॉयस कुलिनन ब्लॅक, लॅम्बोर्गिनी, लॅम्बोर्गिनी उरुस, फोर्ड मुस्टँग, फेरारी, मर्सिडीज बेंझ जी-क्लास आणि जीएमसी आणि डुकाटी पानिगेल व्ही4 सारख्या सुपरबाइकसह इतर कंपन्यांच्या लक्झरी कार आहेत. या सर्व कार्सची त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर उपलब्ध आहेत.

टॅग्स :carHyderabad