Hyderabad IPS Trainee Alleges Harassment Against Fellow Officer
esakal
देश
अंगावर कंडोम फेकले, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्...; महिला ट्रेनी IPSचे धक्कादायक आरोप; सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Hyderabad IPS Trainee Alleges Harassment Against Fellow Officer : महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत एका महिला आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने आपल्या सहकारी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
