

Aston Martin car involved in the fatal Madhapur road accident in Hyderabad, in which a 26-year-old woman reportedly lost her life.
Sakal
आंध्र प्रदेशातील जन सेना पक्षाचे राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचे पुत्र लिंगमनेनी संजुश यांच्यावर तेलंगणामध्ये एका रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी हैदराबादमधील माधापूर येथील हायटेक सिटी परिसरात घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक बसल्याने २६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.