Indian Student In US: लेक अमेरिकेत रस्त्यावर उपाशी, भारतात आईची धावपळ... एस जयशंकर यांना मदतीचे आवाहन

Indian Student In US
Indian Student In US

Indian Student In US : हैदराबाद येथील एक मुलगी सैय्यदा लुलू मिन्हाज झैदी ही अमेरिकेत पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी गेली होती. दरम्यान ती अचानक शिकागोच्या रस्त्यावर उपासमारीचा सामना करत असल्याचे दिसले. तिच्या वस्तू चोरी झाल्यामुळे ती नैराश्यात आली आहे.

सैय्यदाची आई सैय्यदा वहाज फातिमा यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून त्यांच्या मुलीला भारतात परत आणण्याचे आवाहन केले आहे. भारत राष्ट्र समितीचे नेते खलीकुर रहमान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हे पत्र शेअर केले आहे.

पत्रात आई म्हणाली, तिची मुलगी सैय्यदा लुलू मिन्हाज झैदी तेलंगणातील मौला अली येथील रहिवासी आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये त्यांनी अमेरिकेत डेट्रॉईमधील TRINE विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेली होती. ती काही दिवस कुटुंबाच्या संपर्कात होती.

Indian Student In US
Raj Thackeray Latest News : "सध्या विरोधीपक्ष कोण? आमचा एकच पक्ष..."; राज ठाकरेंचं राजकीय परिस्थितीवर भाष्य

मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ती संपर्कात नाही. आता काही दिवसांपूर्वी कळले की ती नैराश्यात आहे. तिचे सामान चोरीला गेले आहेत. तसेच ती उपासमारीचा सामना करत असून शिकागोच्या रस्त्यावर भटकत आहे. (latest global news)

भारतीय दूतावासाला विनंती करुन मुलीला परत आणण्याची विनंती महिलेने केली आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काय निर्णय घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Indian Student In US
Viral Video: 'ब्रिटिशांची औलाद आहे का? मस्ती आली असेल तर...', शिंदे गटाच्या खासदाराची तहसीलदाराला तंबी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com