Viral Video: 'ब्रिटिशांची औलाद आहे का? मस्ती आली असेल तर...', शिंदे गटाच्या खासदाराची तहसीलदाराला तंबी

तहसीलदार आमचे फोन घेत नाही, आमच्या अडचणी जाणून घेत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे केल्या होत्या
Viral Video
Viral VideoEsakal

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदाराला शिंदे गटाच्या खासदाराने चांगलेच खडसावले आहे. शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करू नका. तुम्हाला हे कितीवेळा सांगायचं? आता हे इंग्लिशमध्ये सांगू का? अशी तंबी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदाराला दिली आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसमोरच पाटील यांनी तहसीलदाराला चांगलंच झापलं आहे. तहसीलदाराला खडेबोल सुनावत असतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

'तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांचे प्रश्न सोडवा. तुम्ही काय ब्रिटिशांची औलाद आहात का? अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरवीन', अशी धमकीवजा तंबी हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिली आहे. माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान ही घटना घडली आहे.

Viral Video
Eknath Shinde Latest Update : पालकमंत्रीपद पण निधीच नाही, तानाजी सावंतांच्या 150 कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती

हिंगोलीत पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे माहुर तालुक्यात आले होते. माहुर दौऱ्यावर असताना माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी थेट किशोर यादव यांची खरडपट्टी केली आहे.

Viral Video
Monsoon Session: ‘राष्ट्रवादी’चे आमदार अधिवेशनात हजेरीसाठीच उपस्थित; द्विधा मनःस्थितीमुळे बहुतांश सदस्यांची कामकाजाकडे पाठ?

तहसीलदार फोन उचलत नाहीत, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत नाहीत अशा अनेक तक्रारी नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर केल्या.

नागरिकांच्या तक्रारीनंतर हेमंत पाटील यांनी किशोर यादव यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. 'नागरिकांच्या शंभर तक्रारी आल्या आहेत. त्यांची कामे का करत नाहीत? काय ब्रिटीशांची औलाद आहे का? लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढलीय का?'असं म्हणत त्यांनी तहसीलदारांना झापलं. त्यानंतर फोन न उचलण्याच्या मुद्यावरूनही खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Viral Video
Sharad Pawar Latest Update : शरद पवारांना सोलापूरमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्याच्या मुलाचा अजितदादांच्या गटात प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com