
बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटर नंतर दिशाच्या वडिलांच्या भावना मीडियाने जाणून घेतल्या.
हैदराबाद : दहा दिवसांपूर्वी, हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून, तिला जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना आज, सायबराबात पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पण, आज, एन्काऊंटरनंतर घडलं ते योग्यच घडलं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
'मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल'
बलात्कार झालेल्या तरुणीचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. पोलिस आयुक्त सीव्ही सज्जनार यांनी तिला दिशा असे नाव दिले होते. आज, एन्काऊंटर नंतर दिशाच्या वडिलांच्या भावना मीडियाने जाणून घेतल्या. ते म्हणाले, 'माझ्या मुलीचा मृत्यू होऊन दहा दिवस झाले आहेत. पोलिसांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल.'
आणखी वाचा - निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासााठी जल्लादच नाही
हैदराबादमधील पीडितेला लवकर न्याय मिळाला. आरोपींचा खात्मा केल्याचा मला आनंद होत आहे. पोलिसांनी अतिशय योग्य काम केले आहे. पोलिसांवर या प्रकरणाात कोणत्याही प्रकारे कारवाई करू नये, अशी माझी मागणी आहे.
- आशा देवी, दिल्लीतील निर्भयाची आई
आणखी वाचा - 'सलाम तुमच्या कार्याला'; हैदराबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव
निर्भयाला न्याय कधी?
दरम्यान, सोशल मीडियावर यावरून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आई आशा देवी म्हणाल्या, 'गेल्या सात वर्षांपासून मी संघर्ष करत आहे. मी या देशातील न्याय व्यवस्थेकडे आणि सरकारकडे न्याय देण्याची मागणी करत आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी.' राम सिंह, मुकेशसिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि एक अल्पवनीय आरोपी, असे पाच जण याप्रकरणात आरोपी होते. यातील राम सिंहने 11 मार्च 2013 तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर इतर चौघांच्या फाशीची प्रतीक्षा आहे.