Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

Fungus on Cadbury chocolate: अनेकांसाठी कॅडबरी हे आवडीचे चॉकलेट आहे. पण, हैद्राबादमधील एका ग्राहकाला कॅडबरी संदर्भात वाईट अनुभव आला आहे.
Cadbury chocolate
Cadbury chocolate

नवी दिल्ली- अनेकांसाठी कॅडबरी हे आवडीचे चॉकलेट आहे. पण, हैद्राबादमधील एका ग्राहकाला कॅडबरी चॉकलेट संदर्भात वाईट अनुभव आला आहे. ग्राहकाला कॅडबरी चॉकलेटला बुरशी लागल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे कॅडबरीची एक्सपायरी डेट आणखी लांब होती, पण तरीही कॅडबरी खाण्यायोग्य नव्हती. ग्राहकाने यासंदर्भातील फोटो एक्सवर शेअर केले आहेत.

ग्राहकाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकजण हे फोटो शेअर करत असून आपल्याला आलेल्या वाईट अनुभव देखील सांगत आहेत. अनेकांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे कॅडबेरी कंपनीकडून याप्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. ( fungus on Cadbury chocolate)

Cadbury chocolate
Worm In Dairy Milk: कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये चक्क जिवंत अळी? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिलं उत्तर

सदर कॅडबरी चॉकलेट जानेवारी २०२४ मध्ये तयार झाल्याचं त्यावर लिहिण्यात आलंय. शिवाय, कॅडबरी तयार झाल्यापासून १२ महिने खाण्यास योग्य असते हे कॅडबरीच्या कव्हरवर स्पष्ट लिहिलं आहे. त्यामुळे तीन महिन्यातच हे कॅडबरी खराब झाल्याचं स्पष्ट आहे. ग्राहकाने म्हटलं की, मी जेव्हा चॉकलेटचं कव्हर काढलं तेव्हा मला असं काही दिसून आलंय. असं म्हणत ग्राहकाने फोटो शेअर केले आहेत.

ग्राहकाने २७ एप्रिलला ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नोंदवली आहे. त्यानंतर या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी कॅडबरी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकाने म्हटलं की, मलाही असाच अनुभव आला आहे. एकाने म्हटलंय की, कंपनीला कोर्टात खेचायला पाहिजे. यांना असं सोडून चालणार नाही.

Cadbury chocolate
Punjab: चॉकलेट खाल्ल्यानंतर १८ महिन्यांच्या चिमुकलीला रक्ताच्या उलट्या, तपासात धक्कादायक खुलासा

कंपनीने काय म्हटलंय?

ग्राहकाच्या पोस्टला कंपनीने प्रतिसाद दिला आहे. Mondelez इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड ( कॅडबरी इंडिया लिमिटेड) उत्पादनाचा उच्च दर्जा ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं कंपनीने म्हटलंय. कंपनीने ई-मेल आयडी शेअर केला असून ग्राहकाला आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com