स्कूटर चालकाला सात वर्षात बसला 117 वेळा दंड; पोलिसांनी दाखवला हिसका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्कूटर चालकाला सात वर्षात बसला 117 वेळा दंड; पोलिसांनी दाखवला हिसका
स्कूटर चालकाला सात वर्षात बसला 117 वेळा दंड; पोलिसांनी दाखवला हिसका

स्कूटर चालकाला सात वर्षात बसला 117 वेळा दंड; पोलिसांनी दाखवला हिसका

दुचाकी, चारचाकी चालक अनेकदा वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत अशतात. काहीना याचा फटका बसून दंड भरावा लागतो.काहीजण नियमांचे पालन करत हा दंड भरतात. तर काही हा नियम पायदळी तुडवतात. हैदराबादमध्ये असलेल्या एका युवकाला पोलिसांनी 7 वर्षांत 117 वेळा दंड ठोठावला. पण त्याने तो भरला नाही. आता तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

हैदराबाद ची ही घटना आहे. येथे राहणारा फरीद खान नावाच्या मुलाने हे कृत्य केले. त्याने गेल्या 7 वर्षात अनेकदा सिग्नल तोडला आहे. त्यामुळे त्याला 117 वेळा दंड पडला आहे.पण त्याने एकदाही चलान भरलेले नाही. दंडाची रक्कम 29,720 रुपये आहे.

पोलिस शहरात नियमित वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांच्या फरीद खान दिसला. त्याला नामपल्लीच्या जवळ रोखण्यात आले. त्याने हेल्मेट घातले नव्हते. वाहतूक पोलिसांनी जेव्हा रजिस्टर तपासले तेव्हा त्याला 117 वेळा दंड ठोठावल्याचे लक्षात आले. त्याची एकूण रक्कम 29,720 रुपये आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली. तसेच त्याला चलान व्याजासह भरून स्कूटर सोडवून घेण्यास सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. त्यात पूर्ण दंड न भरल्यास वाहन जप्त करून आरोपपत्र दाखल करणार असल्याचे म्हटले होते. पण त्याने ही नोटीस गंभीरपणे घेतली नसल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली.

हेही वाचा: राष्ट्रपती भवनात घुसखोरी करणाऱ्या दोघांना अटक

loading image
go to top