Positive Story - महिलेनं दागिने विकून जीम उघडली; फिटनेसनं मिळवून दिली जगात ओळख

women body builder kiran dembala
women body builder kiran dembala

हैदराबाद - महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि त्या पुरुषांच्या बरोबरीने उभा राहत आहेत. तरीही अनेकदा लग्न, संसार यात अडकून पडल्यानंतर महिलांना त्यांच्या आवडी निवडी, करिअर बाजूला ठेवावं लागतं. मात्र भारतातील एक अशी महिला आहे जिने तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं. लग्नानंतर फक्त घर, संसार यात न अडकता तिने स्वत:ची जगात एक वेगळी ओळख निर्माण केली. शरीरसौष्ठव म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी असं समजलं जात असलं तरी महिलांनीसुद्धा या क्षेत्रात नाव कमावलं आहे. हैदराबादमधील अशीच एक महिला आहे जी फिटनेस ट्रेनर आणि गिर्यारोहक आहे. 

हैदराबादच्या असलेल्या किरण देंबला या लग्नानंतर दहा वर्षे रोजचं तेच घरकाम आणि मुलं बाळं यातच गढून गेल्या होत्या. चार भिंतीच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचं त्यांनी ठरवलं आणि सुरुवातीला मुलांचे गायनाचे क्लास घ्यायला सुरुवात केली. पण त्याचवेळी तब्येत बिघडली होती आणि वजनही वाढलं होतं. वजन कमी करण्यासाठी जीम जॉइन केली. जीममध्ये जायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 7 महिन्यात 24 किलो वजन कमी केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kiran dembla (@kirandembla)

जिममध्ये वर्कआउट करत असताना कुटुंबातील जबाबदाऱ्यासुद्धा किरण यांनी समर्थपणे सांभाळल्या. दरम्यान, त्यांनी आपल्याला जीम उघडायची असल्याचं पतीला सांगितलं. पतीनेसुद्धा त्यांच्या या नव्या कामाला प्रोत्साहन दिलं. जीमसाठी जागेची अडचण होती आणि त्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला. जीमचं साहित्य आणण्यासाठी दागिने विकले आणि कर्ज घेतलं. चारच महिन्यात जीमचं नाव आजुबाजुच्या परिसरात झालं. 

सुरुवातील फक्त वजन कमी करण्यासाठी जीम सुरू केलेल्या किरण यांनी शरिरसौष्ठव स्पर्धांची तयारी केली. त्यांनी बुडापेस्टमधील स्पर्धेत भाग घेतला आणि सहावा क्रमांक पटकावला. आज वयाच्या 45 व्या वर्षी त्या ट्रेनर म्हणून काम करत आहेत. डीजे, गिर्यारोहक आणि फोटोग्राफर अशी त्यांची ओळख आहे. किरण देंबला म्हणतात की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे आणि लोकांना एकच सांगेन की तेच करा ज्यातून आनंद मिळतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com