

Hydrogen Train India
esakal
नवी दिल्ली : रेल्वेगाडीची क्षमता दोन हजार प्रवाशांपेक्षा जास्त आहे आणि दररोज संपूर्ण मार्गावर केवळ ६० ते ८० प्रवासीच प्रवास करीत आहेत, अशी स्थिती देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची आहे. हरियानातील जिंद ते सोनीपत या ८९ किलोमीटरच्या मार्गावर चालणाऱ्या या रेल्वेत प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने तिच्या मार्गाचा दिल्लीपर्यंत विस्तार करण्याची वेळ आली आहे. या मार्गावर यापूर्वी धावणाऱ्या डेमू रेल्वेलाही कमी प्रवासीसंख्येचा सामना करावा लागत होता.