मी इंदिरा गांधी यांची नात, कारवाईला घाबरत नाही; प्रियांका गांधींचं सणसणीत उत्तर

पीटीआय
Friday, 26 June 2020

कानपूरमधील एका आश्रयगृहातील दोन मुली गरोदर असल्याचा आरोप केल्यानंतर  काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाने काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवली होती.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी वारंवार केली आहे. कानपूरमधील एका आश्रयगृहातील दोन मुली गरोदर असल्याचा आरोप केल्यानंतर  काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाने काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीला प्रियांका गांधी यांनी आज उत्तर दिले असून, मी इंदिरा गांधी यांची नात आहे, मी भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही, जी कारवाई करायची आहे ती करा, असे म्हटले आहे. 

मोठी बातमी! बॅंका म्हणाल्या...सरकारी आदेशानुसार नव्हे, तर 'आरबीआय'..
नोटिशीला दिलेल्या उत्तरात प्रियांका म्हणाल्या, की मी जनतेची एक सेविका या नात्याने सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवण्याचे माझे कर्तव्य आहे. माझे काम कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे नाही. उत्तर प्रदेश सरकार आपल्या इतर विभागांद्वारे मला व्यर्थ धमक्या देत वेळ वाया दवडत आहे. जी काही कारवाई माझ्यावर करायची असेल, ती सरकारने करावी. मी सत्य लोकांपुढे मांडत राहीन. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. 

कानपूरमधील शासकीय आश्रयगृहामध्ये दोन मुली गरोदर झाल्या असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. गांधी यांनी ट्विट करत यावर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. 

भारताचे पाणी अडवले का? भूतानने दिले हे उत्तर
गुरुवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाले आहेत. अशावेळी प्रियांका गांधी यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे आहे. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांच्याकडून देशात आणीबाणी लादण्यात आली होती. यामुळे लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्यात आले होती. मार्च 1977 मध्ये आणीबाणी उठवण्यात आली होती. 

प्रियांका गांधी यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर तीन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. तसेच कानपूरमधील बाल आश्रयगृहाबाबत गांधी यांनी केलेलं वक्तव्य दिशाभूल करणारं असल्याचं बाल संरक्षण आयोगाने म्हटलं होतं.

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये वाढत जाणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्य़ा अधिक असल्याचा दावा त्यांनी केला होता. भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am Indira Gandhi's granddaughter not afraid of action said Priyanka Gandhi