VIDEO: 'मी विष्णुचा कल्की अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही'

VIDEO: 'मी विष्णुचा कल्की अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही'

अहमदाबाद : गुजरात सरकारमधील एका अधिकाऱ्याने (Gujarat government official) असा एक दावा केला होता जो ऐकून तुम्हाला हसावं की रडावं ते समजणार नाही. ही बातमी देखील तशीच आहे, जी तुम्हाला हैराण करेल. या सरकारी अधिकाऱ्याने असा दावा केला होता की, तो स्वत: भगवान विष्णुचा दहावा अवतार आहे. कल्की अवतार असल्याकारणाने तो आता ऑफिसमध्ये येऊ शकत नाही. याचं कारण देखील या कथित कल्की अवताराने (Kalki avatar) मोठं मजेशीर दिलं होतं. या व्यक्तीने म्हटलं होतं की, मी 'जगाचं अंत:करण' बदलण्यासाठी तपस्या करत असल्यामुळे (penance to change the global conscience) ऑफिसला येऊ शकत नाही. सरदार सरोवर पुनवर्सण एजन्सीचे (Sardar Sarovar Punarvasvat Agency - SSPA) इंजिनिअर अधिकारी रमेश चंद्र फेफर यांनी कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना म्हटलंय की माझ्या तपस्येचं आभार माना कारण माझ्यामुळेच देशात चांगला पाऊस होत आहे. फेफर यांना दिलेली ही नोटीस आणि त्याचं उत्तर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 2018 मध्ये ही घटन घडली असली तरीही त्यांचं म्हणणं नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा उचलून धरलं आहे. 'काम चुकवण्याचं हे परफेक्ट उदाहरण' असल्याचं म्हणत पुन्हा एकदा या कल्की अवताराची आठवण नेटकऱ्यांनी काढली आहे.

VIDEO: 'मी विष्णुचा कल्की अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही'
कोरोनासाठी अनोखा ‘इलेक्ट्रिक मास्क’; शुद्ध हवेसाठी उपयुक्त
VIDEO: 'मी विष्णुचा कल्की अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही'
'प्रामाणिक व्यक्तीला न्याय मिळत नाही'; तरुणाची आत्महत्या

राजकोटमधील आपल्या घरी मीडियाशी बोलताना फेफर यांनी म्हटलं होतं की, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये सर्वांनी माझी थट्टा उडवली अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आज देखील माझ्यावर हसत आहात कारण तुम्ही माझ्यातील देव पाहण्यास असमर्थ आहात. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र मी खरोखरच भगवान विष्णुचा दहावा अवतार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी ते सिद्ध देखील करुन दाखवेन. मी मार्च 2010 मध्ये ऑफिसमध्ये होतो तेंव्हा मला जाणवलं की मी कल्की अवतार आहे आणि तेंव्हापासूनच माझ्याकडे दिव्य शक्ती आहेत.

एजन्सीकडून जारी करण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीच्या उत्तरामध्ये फेफर यांनी म्हटलं होतं की, मी कार्यलायत येऊ शकत नाही कारण मी सध्या तपस्या करण्यात व्यस्त आहे. दोन पानी आपल्या उत्तरात पुढे त्यांनी म्हटलंय की, मी वयाच्या पाचव्या दशकात प्रवेश करण्यासोबतच जगाचं अंत:करण बदलण्यासाठी आपल्या घरातच सध्या तपस्या करत आहे. मी ऑफिसमध्ये बसून याप्रकारची तपस्या करु शकत नाही.

पुढे या अधिकाऱ्याने दावा केला होता की, त्यांच्या तपस्येमुळेच भारतात गेल्या 19 वर्षांपासून चांगला पाऊस पडत आहे. रमेश चंद्र यांनी पुढे म्हटलंय की, आता सरदार सरोवर पुनर्वसन एजन्सीला ठरवायचं आहे की, मी ऑफिसमध्ये बसणं आवश्यक आहे की देशाला दुष्काळापासून वाचवणं महत्त्वाचं आहे. मी कल्कीचा अवतार असल्याकारणानेच देशात चांगला पाऊस पडतो आहे. या नोटीशीनुसार, फेफर गेल्या आठ महिन्यांमध्ये वडोदरामधील आपल्या ऑफिसमध्ये केवळ 16 दिवसच उपस्थित राहिले होते. सरदार सरोवर परियोजनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनाचं काम त्यांची एजन्सी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com