गुजरात दौऱ्यात राहुल गांधींनी हार्दिक पटेलची नाराजी केली दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik patel

गुजरात दौऱ्यात राहुल गांधींनी हार्दिक पटेलची नाराजी केली दूर

दाहोद (गुजरात) : मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे, असं स्पष्टीकरण गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी दिलं आहे. काँग्रेसच्यावतीनं दाहोद इथं आयोजित आदिवासी सत्याग्रह रॅलीमध्ये पटेल यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (I am very much in Congress says Gujarat leader Hardik Patel amid exit rumours)

हेही वाचा: दलित असल्यानेच खासदार नवनीत राणांवर अन्याय:आठवले

हार्दिक पटेल म्हणाले, मी या कार्यक्रमाला का येणार नाही, मी काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष आहे. जेव्हा केंद्रीय नेतृत्व येईल तेव्हा मी निश्चितच इथं असणार. मी अजूनही काँग्रेस पक्षातचं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर राज्य नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करणार का? असं विचारलं असता पटेल यांनी तिरकस उत्तर दिलं. ते म्हणाले, "जेव्हा केंद्रीय नेतृत्व येथे असेल, तेव्हा ते निश्चितपणे राज्य नेतृत्वाशी बोलतील फक्त माझ्याशीच नाही. तसेच ते इतर गोष्टींवरही चर्चा करतील"

हेही वाचा: दलित असल्यानेच खासदार नवनीत राणांवर अन्याय:आठवले

दरम्यान, गेल्या महिन्यात हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर बायोमधून पक्षाचं नाव हटवलं होतं तसेच आपला फोटो बदलत भगवी शाल अंगावर घेतलेला नवा फोटोही लावला होता. यामुळं हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्ष सोडला असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

हेही वाचा: कुतूब मिनारला 'विष्णू स्तंभ' घोषीत करा; हिंदू संघटनेची मागणी

पण काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या अफवा खोडून काढताना पटेल म्हणाले, “प्रत्येकजण व्हॉट्सअॅप डीपीमध्ये कधी पत्नीसोबत, कधी आईसोबत फोटो लावतो. माझामध्ये कार्याध्यक्ष ते सामाजिक व राजकीय कार्यकर्ता असा बदल झाला आहे, त्यामुळं मी तसा फोटो बदलला त्यात गैर काय? मी अजूनही काँग्रेससोबत आहे. पाटीदार नेते नरेश पटेल यांच्या भाजपसोबतच्या नुकत्याच झालेल्या बैठकींवर हार्दिक पटेल म्हणाले, "नरेश पटेल यांनी लवकरच निर्णय घ्यावा, असे मी म्हणेन. ते केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करत आहेत, त्यामुळे मी हस्तक्षेप करणार नाही, पण ते शहाणे आहेत आणि लवकरच निर्णय घेतील "

Web Title: I Am Very Much In Congress Says Gujarat Leader Hardik Patel Amid Exit Rumours

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GujaratDesh news
go to top