
कुतूब मिनारला 'विष्णू स्तंभ' घोषीत करा; हिंदू संघटनेची मागणी
नवी दिल्ली : जुन्या दिल्लीतील जागतिक वारसा असलेल्या कुतूब मिनारला विष्णू स्तंभ घोषीत करा, अशी मागणी 'महाकाल मानव सेवा' या हिंदू संघटनेनं केला आहे. यासाठी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुतूब मिनार परिसरात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली तसेच इथं हनुमान चालीसाचं पठणं केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Mahakal Manav Sewa demand renaming of Qutub Minar as Vishnu Stambh)
युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष जय भगवान गोयल यांनी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. गोयल यांनी इतर हिंदू संघटनांना कुतूब मिनार परिसरात हुमान चालीसा पठणामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं तसेच त्यांना इथल्या मशिदीमध्ये प्रार्थना करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा: 'बृजभूषण यांच्या...', बैठक संपताच मनसेची UP तील आंदोलनावर प्रतिक्रिया
दरम्यान, कुतूब मिनारच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं होतं की, कुतूब मिनार हा प्रत्यक्षात विष्णू स्तंभ आहे. २७ हिंदू आणि जैन मंदिरांना उद्धस्त करुन त्यातील सामग्रीच्या माध्यमातून कुतूब मिनार उभारण्यात आला होता. याची सुपरइम्पोझ्ड रचना ही केवळ हिंदू समाजाला डिवचण्यासाठी बनवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.
हेही वाचा: शिवकुमार शर्मा यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी भावूक, 'यापुढे...'
दरम्यान, विहिंपने शनिवारी मागणी केली होती की, सरकारनं कुतूब मिनार परिसरात प्राचीन मंदिरांचं पुनर्निर्माण करावं तसेच तिथं हिंदू परंपरांनुसार प्रार्थना पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. बन्सल यांच्यासह विहिंपच्या नेत्यांच्या एका गटानं या स्मारक परिसराचा दौरा केला होता. ज्यामध्ये १९९३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
Web Title: Mahakal Manav Sewa Demand Renaming Of Qutub Minar As Vishnu Stambh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..