मी काय चुकीचं बोललो : नसरुद्दीन शाह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी काल (गुरुवार) केले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, मी काय चुकीचं बोललो. यापूर्वी मी जे वक्तव्य केले होते ते एक चिंताग्रस्त भारतीय म्हणून केले. त्यानंतरही मी हेच वक्तव्य करत आहे.

अजमेर येथील सेंट अन्सेलम्स माध्यमिक शाळेत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी काल भाष्य केले होते. 

त्यानंतर आज शहा म्हणाले, की मी असे काय बोललो, की आता मी विश्वासघात केल्यासारखे मला म्हटले जात आहे. ही एक विचित्र गोष्ट आहे. मी काय चुकीचं बोललो. यापूर्वी मी जे वक्तव्य केले होते, ते एक चिंताग्रस्त भारतीय म्हणून केले. त्यानंतरही मी हेच वक्तव्य करत आहे.

Web Title: I did not say anything wrong about the safety of my children says Naseeruddin Shah