esakal | पत्रकार परिषदेतील 'त्या' प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, मला पत्रकार व्हायचे नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

 rahul gandhi, Modi Government, Congress

अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी या दोन लोकांनी तुम्हाला कोणता गुरुमंत्र दिला, असा प्रश्न राहुल गांधींना एका पत्रकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला होता.

पत्रकार परिषदेतील 'त्या' प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, मला पत्रकार व्हायचे नाही!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे ओढावत असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय त्यांनी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यासोबतही खुली चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.  अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी या दोन लोकांनी तुम्हाला कोणता गुरुमंत्र दिला, असा प्रश्न राहुल गांधींना एका पत्रकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला होता. यावर राहुल गांधी म्हणाले की, मी तुमच्या क्षेत्रात येणार नाही. मला पत्रकार व्हायचे नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. 

कैद्यावर लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांचा मध्यरात्री लागला डोळा अन् दोन तासांनी उघडकीस आली ही घटना...

राहुल गांधी पुढे म्हणाले ,  मी केवळ दिग्गज अर्थशास्त्रज्ञांसोबतच नव्हे तर मजूर, छोटे उद्योजक, शेतकरी यांच्याशी चर्चा करत असतो.  मला पत्रकार व्हायचे नाही, त्यामुळे तुम्ही घाबरु नका. कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी चर्चा होते. ही चर्चा नेहमी बंद खोलीत होते. काहीवेळा चर्चा गंभीर स्वरुपाची असते तर कधी हलक्या फुलक्या स्वरूपातील चर्चाही उपयुक्त माहिती समोर येते. बंद खोलीत मला जे ऐकायला मिळते ते जनतेही ऐकावे असे वाटले. त्यामुळे या संभाषणाची एक झलक दाखवून दिली, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ज्ञान आणि समज ही सर्वांकडेच असते. मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी यांच्यासोबत देखील अशा प्रकारची चर्चा निश्चित करु, असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले आहे.

लॉकडाउनचा तिरुपती देवस्थानलाही फटका; झालं एवढ्या रुपयांचं नुकसान  

कोरोनाजन्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत काय झाले यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्यापेक्षा सध्याच्या घडीला निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना कसा करावा यावर विचार करणे ही विरोधी पक्षाची भूमिका असेल, असेही स्पष्ट केले. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी देशातील गरिब जनतेच्या खिशात पैसा देण्याची व्यवस्था करणे हा उत्तम मार्ग आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजमधील तरतूदींमध्ये बदल करावा, अशी सूचनाही राहुल गांधी यांनी यावेळी केली. 

जगाचा नव्हे देशाचा विचार करा! राहुल गांधींचा मोदींना प्रेमळ सल्ला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाअंतर्गत केलेल्या घोषनेमध्ये काँग्रेसच्या मनरेगा योजनेला नव संजीवनी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारने संकटजन्य परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसची न्याय योजना तात्पूरती लागू करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले आहे. मनरेगा ही ग्रामीण भागातील लोकांना काम मिळवून देण्यास फायदेशीर असून न्याय योजना ही शहरी भागाचा विचार करुन तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
 

loading image