नवऱ्यानं फोटोग्राफरवर काढला राग; लोटपोट हसणाऱ्या नवरीचा VIDEO VIRAL

bride video viral laughing photographer
bride video viral laughing photographer
Updated on

हल्ली कोणताही कार्यक्रम असो, नसो पण फोटोग्राफीचं वेड मात्र प्रचंड वाढलं आहे. वाढदिवसापासून ते लग्नापर्यंत, याशिवाय इतर अनेक लहान लहान कार्यक्रमांचे फोटो काढले जातात. त्यासाठी खास वेळ काढला जातो. फोटोग्राफरशिवाय कार्यक्रमांमध्ये मोबाइलवरून फोटो, व्हिडिओ शूट करणारेही असतातच. अशाच काही व्हिडिओमधून अनेक गमती जमती समोर येत असतात.

सध्या सोशल मीडियावर लग्नातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नववधू स्टेजवरच अक्षरश: लोळून हसायला लागते. 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुरुवातीला नेहमीसारखाच एक फोटोग्राफर वधु वरांचे फोटो काढताना दिसतो. त्यात कपलचे फोटो काढल्यानंतर फोटोग्राफर वराला बाजुला करून फक्त नवरीचे फोटो क्लिक करतो. तेव्हा नवरा एका बाजुला उभा असतो आणि त्याच्याकडे फोटोग्राफरचं लक्षही नसतं. 

नवरीचे क्लोजअप फोटो घेत असताना फोटोग्राफर तिला पोझ सांगतो. दोन तीन वेळा पोझ सांगितल्यानंतर नवऱ्याला अचानक राग येतो आणि तो फोटोग्राफरच्या डोक्यावर मारतो. यावेळी फोटोग्राफर मागे सरकतो, तोपर्यंत नवरी इतक्या जोरात हसायला लागते की स्टेजवरच बसते. हसता हसता ती चक्क लोळतेसुद्धा, हसू आवरत नसलेल्या नवरीला पाहून उपस्थित मंडळीसुद्धा हसायला लागतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अशीच नवरी पाहिजे म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com