Income Tax Notice: काँग्रेसला मोठा झटका! आयकर विभागाने पाठवली 1,700 कोटींची नोटीस; काय आहे कारण?

Income Tax Notice: काँग्रेसला आयकर विभागाने मोठा धक्का दिला आहे. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला 1700 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षासाठी पाठवण्यात आली आहे.
I-T serves Congress Rs 1, 700 crore notice after HC rejects its plea on reassessment
I-T serves Congress Rs 1, 700 crore notice after HC rejects its plea on reassessment Sakal

Income Tax Notice: काँग्रेसला आयकर विभागाने मोठा धक्का दिला आहे. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला 1700 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षासाठी पाठवण्यात आली आहे. आयकर विभागाने पाठवलेल्या या नोटीसमध्ये कर, दंड आणि व्याजाचीही भर घालण्यात आली आहे.

यापूर्वी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयानेही काँग्रेसला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली. आयकर विभागा विरुद्ध काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आयकर विभागाच्या नोटीसमुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेसचे वकील आणि राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. आयकर विभागाची कारवाई अनावश्यक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.

I-T serves Congress Rs 1, 700 crore notice after HC rejects its plea on reassessment
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यास दिला नकार

लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यांमधून आयकर विभागाने यापूर्वीच 135 कोटी रुपये वसूल केले आहेत.

काँग्रेसच्या आयकर दस्तऐवजात या वर्षी 14 लाख रुपये रोख देणग्या मिळाल्याचे दिसून आले आहे. हे नियमांच्या विरोधात आहे. कोणताही पक्ष 2000 पेक्षा जास्त देणग्या रोख स्वरूपात स्वीकारू शकत नाही असा नियम आहे. काँग्रेसने या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना करसवलत मिळाली नाही. याविरोधात पक्षाने याचिकाही दाखल केली होती.

I-T serves Congress Rs 1, 700 crore notice after HC rejects its plea on reassessment
Arvind Kejriwal: दिलासा नाहीच! अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली

आयकर विभागाची कारवाई सरकार निवडणुकीपूर्वी त्यांची खाती जप्त करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक लढवण्यासाठीही पक्षाकडे निधी नाही, त्यामुळेच प्रचारावर पैसे खर्च करता येत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आयकर विभागाचे म्हणणे आहे की, ते केवळ त्याची वसुली करत आहेत आणि कोणतीही खाती गोठवली नाहीत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com