मी मरेन; पण मोदींच्या आई-वडिलांबद्दल कधीही वाईट शब्द काढणार नाही: राहुल

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या वडिलांचा आणि आजीचा अवमान केला. मी मात्र त्यांच्या कुटुंबीयांचा असा अवमान करणार नाही, असे राहुल आज म्हणाले. "मोदी कायम द्वेषभावनेने बोलतात. माझ्या कुटुंबीयांचा अवमान करतात. मी मरेन; पण मोदींच्या आई-वडिलांबद्दल कधीही वाईट शब्द काढणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या वडिलांचा आणि आजीचा अवमान केला. मी मात्र त्यांच्या कुटुंबीयांचा असा अवमान करणार नाही, असे राहुल आज म्हणाले. "मोदी कायम द्वेषभावनेने बोलतात. माझ्या कुटुंबीयांचा अवमान करतात. मी मरेन; पण मोदींच्या आई-वडिलांबद्दल कधीही वाईट शब्द काढणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही मोदींना प्रेमाने जिंकू. कारण, मी रा. स्व. संघ किंवा भाजपचा नाही; तर कॉंग्रेसच्या विचारसरणीचा आहे,' राहुल गांधी उज्जैन येथील एका प्रचार सभेत बोलत होते.

गेल्या 70 वर्षांत काहीही विकास न झाल्याचे मोदी वारंवार सांगत आहेत. पण, मोदींबाबतचे सत्य आता जनतेच्या रडारवर आले आहे, असे मत यावेळी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will die but never insult his parents says Rahul Gandhi on PM Modi