इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग | IAF | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mi-17-chopper

इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: पूर्व अरुणाचल प्रदेशमध्ये इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग (Helicopter crash land) झालं. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही. दोन वैमानिकांसह (Pilot) तीन क्रू सदस्य या हॅलिकॉप्टरमध्ये होते. त्यांना कुठलीही इजा झालेली नाही, ते सुरक्षित आहेत. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पटनीटॉप टुरिस्ट रिसॉर्टजवळ शिव गड धर भागात लष्कराच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग झाले होते. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: मोबाइल रिचार्ज कंपनी ते Paytm, अब्जाधीश विजय शेखर शर्मा यांची गोष्ट

तीन ऑगस्टला पठाणकोटमध्ये रणजीत सागर धरणाजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.

loading image
go to top