esakal | महिला अधिकाऱ्याला 'टू फिंगर टेस्ट' सल्ला; IAF प्रमुखांना महिला आयोगाचे पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटवर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

IAF महिला अधिकाऱ्याला 'टू फिंगर टेस्ट' सल्ला; हवाई दल प्रमुखांना महिला आयोगाचे पत्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटवर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. तसंच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना महिलांची टू फिंगर टेस्ट करू नये असा सल्ला दिला आहे. महिला आयोगाने हवाई दलाच्या डॉक्टरांनी पीडित महिलेला दिलेल्या सल्ल्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. महिला आयोगने टू फिंगर टेस्ट विरोधात महिला अधिकाऱ्याला पत्रसुद्धा लिहिलं आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणी आवश्यक पावले उचलण्यासाठी आणि वायुसेनेच्या डॉक्टरांना सरकार आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी आवश्यक ज्ञान देण्यासाठी हवाईदल प्रमुखांना पत्र लिहिले.

हेही वाचा: मान्सूनचा परतीचा प्रवास ६ ऑक्टोंबरपासून - IMD

राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय हवाई दलाच्या एका 28 वर्षीय महिला अधिकाऱ्याच्या 'टू-फिंगर टेस्ट ''वर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि हवाई दल प्रमुखांना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटवर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.त्याची पुष्टी कारण्यासाठी टु फिन्गर टेस्ट करण्यात आली होती.

टू फिंगर टेस्ट करण्यास भारतात बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आठ वर्षापूर्वी निर्णय देताना पूर्णपणे बंदी घातली होती. महिला आयोगाने हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यास आणि कारवाई करण्यास सांगितलं आहे.

loading image
go to top