'पुन्हा मोदीच'; पंतप्रधानपदासाठी IANS-C Voter सर्व्हेतून लोकांची पसंती

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये IANS-C Voter कडून हा सर्व्हे करण्यात आला आहे.
PM narendra modi
PM narendra modiSakal

नवी दिल्ली : भाजपाने आणि देशातील सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान एका सर्व्हेमधून मोदींना पंतप्रधानपदासाठी लोकांची अजूनही पसंती असल्याचं समोर आलं आहे. देशातील आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये IANS - C Voter कडून हा सर्व्हे करण्यात आला आहे.

IANS-C Voter कडून केल्या गेलेल्या चार राज्यातील सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी लोकांनी मोदींना पसंती दिल्याचं समोर आलं आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या राज्यात २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या राज्यातील लोकांची अजूनही पंतप्रधापदासाठी मोदींना पसंती दिली असून राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या सर्वेक्षणातील यादीत खाली आहेत.

PM narendra modi
'15 दिवसांत इमारत पाडा नाहीतर...'; राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा

या सर्वेक्षणादरम्यान आसाममधील ४३ टक्के जनतेने मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच ११.६२ टक्के लोकांनी केजरीवाल आणि १०.७० टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. केरळमध्ये राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला तेथे २८ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे तर २०.३८ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना आणि ८.२८ टक्के लोकांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे.

PM narendra modi
यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या रस्तावर भिंत कोसळली; 10 हजार लोक अडकले

तिसऱ्या स्थानावर ममता बॅनर्जी

तामिळनाडूमध्ये २९.५६ टक्के लोकांनी मोदींना समर्थन दिलं आहे तर राहुल गाधींना २४.६५ टक्के आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना ५.२३ टक्के लोकांनी पाठिंबा दिला असून या यादीत त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्येही ४२ टक्के लोक मोदींना पसंती देत आहेत. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना २६ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांना पश्चिम बंगालमध्ये १४ टक्के लोकांनी पाठिंबा दिल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com