IPS Kumar Case
esakal
IPS पुरण कुमार यांनी ७ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली.
IAS अमनीत पी. कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध छळाची तक्रार केली.
पोलिसांनी १० हून अधिक IPS आणि IAS अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केला.
IPS Kumar Case : हरियाणा पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर राज्यातील प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात १० हून अधिक वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांवर गुन्हा (Haryana IPS FIR) दाखल करण्यात आला आहे. हा खटला आयपीएस वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येशी संबंधित असून त्यांची पत्नी आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे.