
Puja Khedkar IAS Fraud Case : बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS) बनलेल्या पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. तिनं कोणाचा खून केलाय का? असा सवाल विचारत कोर्टानं तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं हा जामीन मंजूर केला.