

IAS Officer Buys 40 Villas
Esakal
वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने अनंता रिसॉर्टमध्ये ४० विला कॉटेज खरेदी केले आणि तेच पुन्हा कंपनीला भाड्यानं दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता या प्रकरणी आयएएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या असून त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवलं आहे. आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल यांच्यावर राजस्थान सरकारने ही कारवाई केलीय. रिसॉर्टमध्ये ४० व्हिला खरेदी केल्यानंतर आयएएस शिखर अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.