IAS Officer Accident : जेवर्गीजवळ झालेल्या भीषण अपघातात आयएएस अधिकाऱ्यासह चौघे जागीच ठार, एक जण गंभीर जखमी
IAS Officer Mahantesh Bilgi Dies in Jevargi Road Accident : जेवर्गीजवळ मोटारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात आयएएस महांतेश बिळगी यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.
बंगळूर : जेवर्गीजवळ झालेल्या भीषण अपघातात आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्यासह (IAS Officer Accident) चौघांचा मृत्यू झाला. रामदुर्गहून गुलबर्ग्याकडे जात असताना त्यांचे मोटारकारवरील नियंत्रण सुटून ती उलटली.