शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याला हटवलं, मतमोजणीच्या आधी भाजपच्या बंडखोर नेत्याने केलेली IAS विरोधात तक्रार

UP Teacher MLC Poll: भाजपच्या बंडखोर नेत्यानं केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीआधी निवडणूक अधिकारी असलेल्या आयएएस अधिकाऱ्याला हटवलं आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलीय.
IAS Abhay Singh

IAS Abhay Singh

Esakal

Updated on: 

शिक्षक मतदारसंघात निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्याला हटवण्यात आलंय. निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या आधीच हा निर्णय घेतला. भाजपच्या बंडखोर नेत्यानं अधिकाऱ्याच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. गोरखफूर फैजाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. यात मतमोजणीआधी मोठ्या घडामोडी घडल्या. आयएएस अभय सिंह यांच्या जागी प्रकाश बिंदू यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. याआधीही आयएएस अभय सिंह हे २०१९मध्ये अवैध खाण प्रकरणी चर्चेत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com