IAS अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री मेहेरबान! निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिली कॅबिनेटमध्ये महत्वाची जबाबदारी

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खाजगी सचिव असलेले व्हीके पांडियन यांना ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार आहे.
IAS अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री मेहेरबान! निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिली कॅबिनेटमध्ये महत्वाची जबाबदारी

IAS VK Pandiyan:ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खाजगी सचिव असलेले व्हीके पांडियन यांना ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार आहे. स्वेच्छेने निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतरच त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.

व्ही के पांडियन यांचा राजकीय वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. व्हीके पांडियन हे नवीन पटनायक यांचे गेल्या १२ वर्षांपासून स्वीय सचिव होते. ओडिशा सरकारकडून सांगण्यात आले आहे की पांडियन यांची 5T (ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते थेट मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.

नवीन पटनायक यांच्याशी जवळीक असल्यामुळे व्ही.के. पांडियन यांचा दर्जा वाढला, असं सांगण्यात येतय. ते नवीन पटनायक यांचे मूळ गाव गंजामचे जिल्हाधिकारीही राहिले आहेत. यानंतरच दोघांची जवळीक वाढली. ते मयूरभंजचे जिल्हाधिकारीही राहिले आहेत. नवीन पटनायक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2011 पासून ते पटनायक यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत.

४९ वर्षीय पांडियन हे तमिळ आहेत आणि ते पंजाब केडरचे आयएएस अधिकारी होते. मात्र, त्यांनी आयएएस अधिकारी सुजाता राऊत यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर त्यांनी आपला केडर बदलला. ओडिशाच्या नवीन पटनायक सरकारमध्ये त्यांनी अनेक योजनांसाठी असे काम केले ज्यामुळे पटनायक खूप प्रभावित झाले.

याशिवाय ते सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. त्याचा जनसंपर्क असा होता की त्यांनी कॅमेरा टीमही सोबत घेतली होती. सरकारी योजना आणि कामांच्या पाहणीच्या वेळी ते व्हिडीओ पोस्ट करत असे. पांडियन आणि नवीन पटनायक यांच्यातील जवळीक इतकी वाढली आहे की अनेक वेळा नेत्यांना त्यांच्यासमोर रांगेत उभे राहावे लागतं होतं, असं सांगण्यात येत. (Latest Marathi News)

IAS अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री मेहेरबान! निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिली कॅबिनेटमध्ये महत्वाची जबाबदारी
शरद पवार आणि रोहित पवारांचं जंगी स्वागत ! जेसीबीतून पुष्पवर्षाव, युवा संघर्ष यात्रेला सुरुवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com