esakal | सीए परीक्षेचा निकाल जाहीर; नंदिनी अगरवाल देशात पहिली
sakal

बोलून बातमी शोधा

B.Ed. Special examination will be conducted by CET candidates

सीए परीक्षेचा निकाल जाहीर; नंदिनी अगरवाल देशात पहिली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत (नवीन अभ्यासक्रमानुसार) देशात नंदिनी अगरवाल (मोरेना) हिने ७६.७५ टक्के गुण मिळवीत पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर इंदौर येथील साक्षी एरन हिने ७६.६३ टक्के गुण मिळवीत दुसरा, तर बंगळूर येथील साक्षी बाग्रेचा हिने ७५.६३ टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक मिळविला आहे.

‘आयसीएआय’तर्फे जुलै २०२१मध्ये सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षा (नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार) घेण्यात आली. नवीन योजनेनुसार अंतिम परीक्षेतील ‘ग्रुप-एक’ची परीक्षा दिलेले २०.२३ टक्के विद्यार्थी, तर ‘ग्रुप दोन’ची परीक्षा दिलेले १७.३६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीए फाउंडेशन परीक्षा दिलेले २६.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील एकूण सात हजार ७७४ विद्यार्थी सनदी लेखापाल होण्यासाठी (सीए) पात्र ठरले आहेत.

हेही वाचा: 'पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?

नवीन योजनेनुसार ‘सीए’ची अंतिम परीक्षेतंर्गत ‘ग्रुप-एक’ची परीक्षा ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील नऊ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ‘ग्रुप-दोन’ची परीक्षा एकूण ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांनी दिली होती, त्यातील सात हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३ हजार ९८१ इतकी होती, त्यातील दोन हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर, देशभरातून ७१ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी फाउंडेशन परीक्षा दिली. त्यातील १९ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १० हजार १५० विद्यार्थी, तर नऊ हजार आठ विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

loading image
go to top