esakal | 'पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?
sakal

बोलून बातमी शोधा

penguins

'पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?

sakal_logo
By
अमित उजागरे

लंडन : काळा आणि पांढला कोट अंगावर चढवल्याप्रमाणं दिसणारा पृथ्वीवरील सर्वात वेगळा पक्षी म्हणून पेंग्विनची ओळख आहे. सध्या या पेंग्विनबाबत एक आश्चर्यकारक चर्चा सुरु आहे. पेंग्विन हा पक्षी परग्रहवासी असल्याचं बोललं जात आहे. पण ही चर्चा सुरु होण्यास तसं ठोस कारणही आहे.

हेही वाचा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

पेंग्विनवर संशोधन सुरु असताना संशोधकांना त्याच्या विष्ठेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं फॉस्फाईन नामक रसायन आढळून आलं आहे. हेच रसायन शुक्र ग्रहावर आढळून येतं असं सांगण्यात येत आहे. युकेमधील संशोधकांनी हा शोध लावला आहे. यामुळेच पेंग्विन हा पक्षी शुक्र ग्रहावरुन पृथ्वीवर आला असावा अशी सध्या चर्चा सुरु आहे. तसेच पेंग्विनच्या शरिरात आढळणारं हे फॉस्फाईन पृथ्वीवर आलचं कसं हे संशोधकांना सांगता येत नाहीए. कारण शुक्र ग्रह हा पृथ्वीपासून ३८ मिलियन माईल्स इतक्या दूर आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - वडेट्टीवार

अभ्यासाअंती संशोधकांना विश्वास वाटतोय की, दुसऱ्या जगातील सजिवांचे अवयव कसे असू शकतील या शोध घेण्यासाठी पेंग्विन त्यांना मदत करु शकेल. केमिकल पुराव्यांच्या आधारे संशोधक आता पेंग्विन पक्षांची जीवनशैली कशी असेल याचा अभ्यास करण्याची योजना आखत आहेत. हा पक्षी बहुतकरुन फाल्कलँड बेटांवर आढळतो.

हेही वाचा: अलिबाग पोलिसांसमोर नारायण राणेंची हजेरी; म्हणाले...

"फॉस्फाईन सापडलंय हे खरं आहे. पण हे रसायन कशापासून तयार होतं हे आम्हाला माहिती नाही. काही विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंपासून हे रसायन तयार झालं असावं. हे तलावाच्या चिखलात, बॅजर या प्राण्यामध्ये आणि पेंग्विन विष्ठेत साहसा आढळून आलं आहे," असं लंडन येथील इम्पिरिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दवे क्लेमेंट्स यांनी सांगितलं. सन २०२० मध्ये शुक्र ग्रहाच्या भोवती असलेल्या वायुमंडळात हे फॉस्फाईन केमिकल आढळून आलं आहे.

loading image
go to top