esakal | घरीच करा कोरोना चाचणी, ICMR ची पुण्यातील टेस्ट किटला मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना टेस्ट

घरीच करा कोरोना चाचणी, ICMR ची पुण्यातील टेस्ट किटला मंजुरी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे : कोरोनाच्या निदान आता घरच्याघरीच करणे शक्य होणार आहे. देशातील पहिली रॅपिड अँन्टीजन टेस्ट (रॅपिड अँन्टीजन टेस्ट) किट मायलॅबने (My Lab) तयार केले होते. आता स्वयं चाचणीसाठी(Self testing) कोव्हिसेल्फ (Coviself) नावाचे नवीन किट मायलॅबने बाजारात आणले आहे. पहिले स्वदेशी स्वयंनिदान किट(Indigenous self-diagnosis kit) असलेल्या कोव्हिसेल्फला भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने (ICMR) परवानगी दिली आहे. कंपनीच्यावतीने गुरुवारी यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. (India approves home test for Covid-19, to cost rps 250 per kit)

कोरोना साथी विरुद्ध लढण्यासाठी मोठ्या लोकसंख्येचे जलद निदान होणे गरजेचे आहे. सध्या आपल्याकडे रॅपिड अँन्टीजनटेस्ट ही जलद निदान चाचणी आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) या प्रयोगशाळेतील चाचणी पद्धती उपलब्ध आहे. यासाठी आपल्याला निदान केंद्रावर जावे लागते तर काही वेळेस प्रयोगशाळेचा कर्मचारी घरी येऊन नमुने घेऊन जातो. आता हे सगळे या स्वंयनिदान किटद्वारे टाळता येणार आहे.

हेही वाचा: लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट

मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले,‘‘कोरोनाच्या काळात आपला देश अनेक आव्हानांना तोंड देत आहे. कोरोनाचे जलद निदान होणे आवश्यक असून, त्यासाठी सर्वात सुसह्य निदान प्रकार विकसित होणे गरजेचे होते. मायलॅबने हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन कोव्हिसेल्फच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या हातात एक प्रकारे सुरक्षा कचच दिले आहे.’’ अमेरिकेच्या तुलनेत भारतात अगदी कमी किमतीत या किट्स उपलब्ध करत आहोत, असा दावा मायलॅबने केला आहे.

हेही वाचा: ‘जम्बो’त महिला डॉक्टर अव्वल; कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

हेही वाचा: घरातच बसावे लागल्याने मुले वैतागली; खेळही झाले बंद

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

loading image