भारताने गाठला चाळीस कोटी चाचण्यांचा टप्पा; ICMR ने दिली माहिती

corona
corona

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचं संकट सध्या थैमान माजवत आहे. गेल्या दोन दीड वर्षांपासून भारतासहित जगभरातील बहुतांश देश या महासाथीशी लढा देत आहेत. दररोज सुमारे 18 लाख चाचण्यांसमवेत भारताने या जून महिन्यामध्ये आतापर्यंतच्या एकूण 40 कोटी चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. याबाबतची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) आज शनिवारी दिली आहे. काल शुक्रवारपर्यंत भारताने 40,18,11,892 कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. 1 जूनपर्यंत भारतात 35 कोटी कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

corona
शाहू महाराजांची आठवण आजही का काढली जाते?

देशभरात जलदगतीने चाचणी करण्याची क्षमता आणि त्यासाठीची व्यवस्था उभी केल्यामुळेच हे शक्य झाले आहे. ICMR तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन परिक्षण क्षमता वाढवून आणि परवडणाऱ्या डायग्नोस्टिक किटमध्ये नावीन्य प्रदान करून देशभरात कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवित आहे, असं ICMR ने म्हटलंय. ICMR चे प्रमुख बलराम भार्गव यांनी म्हटंलय की, चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे कोरोना रुग्णांची लवकर ओळख, त्वरित आयसोलेशन आणि प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे. यामुळेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देखील लक्षणीय रित्या घटला आहे.

corona
डेल्टा व्हेरियंटचा धुमाकूळ; सिडनी शहरात कडक लॉकडाऊन

हा 40 कोटी चाचण्यांचा टप्पा पार करण्यामध्ये भारताने अवलंबलेल्या 5T धोरणाचा प्रभाव आहे. ते 5T म्हणजे Test, Track, Trace, Treat आणि use of Technology हे होय. यामुळेच कोरोनाचा संसर्गाला अटकाव घालणे शक्य झाले आहे, बलराम भार्गव यांनी म्हटलंय. हा कसोटीचा टप्पा हा पुरावा आहे की 5 टी पध्दती ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट अँड टेक्नॉलॉजीचा वापर’ या योजनेचे कार्यकुशलतेने कार्यक्षम करण्यात भारत यशस्वी झाला आहे, ज्यामुळे आपण साथीच्या रोगाचा प्रसार रोखू शकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com