esakal | कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार; भारतात आणखी ६ कीट दाखल

बोलून बातमी शोधा

Corona Testting

वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना टेस्टिंगसाठी वापरली जाणारे कीट यापुढे भारतात वापरली जाणार आहेत. या किटच्या वापरास कोणतीही वैधता (Validity) नाही.

कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार; भारतात आणखी ६ कीट दाखल
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates : नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज तीन लाखापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. अँटीजेन आणि RT-PCR चाचणी केल्यानंतर येणाऱ्या चाचणी अहवालात बरीच तफावत आढळून येत आहे. लक्षणे असूनही अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. तर लक्षणे नसणाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

या पार्श्वभूमीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) भारतात कोरोना चाचणी करण्यासाठी नव्या ६ प्रक्रियांना मान्यता दिली आहे. यापुढे अँटीजेन, आरटी-पीसीआर व्यतिरिक्त आणखी ६ किटद्वारे कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना टेस्टिंगसाठी वापरली जाणारे कीट यापुढे भारतात वापरली जाणार आहेत. या किटच्या वापरास कोणतीही वैधता (Validity) नाही.

हेही वाचा: स्वदेशी कोव्हॅक्सिन कोरोनाच्या 617 स्ट्रेनवर प्रभावी, अमेरिकेचा दावा

देशात कोरोना टेस्टिंग किटची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि नव्या कोरोना केसेसचे त्वरीत परीक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयसीएमआरच्या या निर्णयामुळे युरोप, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, ब्राझीलमधील अनेक जागतिक संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीतील अधिसूचित संस्थांना याचा फायदा होईल. आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने थेट विपणन करण्यास परवानगी दिली आहे.

या आपत्कालीन यादीत कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युरोपियन युनियन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन एजन्सींचा समावेश आहे. या सर्वांना भारतातील किटच्या वैधतेसाठी कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही.