esakal | स्वदेशी कोव्हॅक्सिन कोरोनाच्या 617 स्ट्रेनवर प्रभावी, अमेरिकेचा दावा

बोलून बातमी शोधा

US_Dr_Fauci

सध्या भारतात जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, ती अत्यंत कठीण आहे, पण लसीकरणानंतर यामध्ये बराच मोठा फरक दिसून येईल.

स्वदेशी कोव्हॅक्सिन कोरोनाच्या 617 स्ट्रेनवर प्रभावी, अमेरिकेचा दावा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Covaxin Update : वॉशिंग्टन : आशिया खंडातील अनेक विकसनशील देश कोरोना महामारीमुळे इतर देशांवर अवलंबून आहेत. भारतातही कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. या परिस्थितीतही भारताने स्वदेशी कोरोना लस तयार केली आहे. भारतात भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली अशा दोन लसींद्वारे लसीकरण सुरू आहे. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस आता जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही कोवॅक्सिन लसीबद्दल एक दावा केला आहे. भारतात तयार करण्यात आलेली कोवॅक्सिन लस ही कोरोनाच्या ६१७ व्हॅरियंटवर प्रभावी ठरत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे.

हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना लसीसाठी आजपासून नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे महामारी रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फौसी म्हणाले की, ''सीरम आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या आकडेवारीमध्ये कोवॅक्सिन ही कोरोनाच्या ६१७ व्हॅरियंटवर प्रभावी ठरताना दिसत आहे. सध्या भारतात जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, ती अत्यंत कठीण आहे, पण लसीकरणानंतर यामध्ये बराच मोठा फरक दिसून येईल.''

कोवॅक्सिन SARS-cov-2 कोरोना व्हायरसविरुद्ध प्रतिपिंडे बनविण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा तयार करते. या अँटीबॉडीज स्पाइक प्रोटीनसारख्या व्हायरल प्रोटीनवर कब्जा करतात.

हेही वाचा: जॉर्डनमध्ये ऑक्सिजन अभावी 6 जणांचा मृत्यू; आरोग्यमत्र्यांनी दिला होता राजीनामा

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय चिकिस्ता अनुसंधान परिषद यांच्या मदतीने भारत बायोटेकने कोवॅक्सिनची निर्मिती केली. आणि कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास ३ जानेवारीला मान्यता देण्यात आली होती. कोवॅक्सिन ७८ टक्के प्रभावी असल्याचे चाचणी दरम्यान दिसून आले होते.

कोरोना-१९ व्हायरस के.बी.१.६१७ व्हॅरियंट सर्वात जास्त दिल्ली आणि महाराष्ट्रात दिसत आहेत. नव्या तीन प्रोटीन प्रकारांमध्येही चांगली वृद्धी पाहायला मिळाली आहे. झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येला हा व्हॅरियंट कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.