कोरोना चाचणीसंदर्भात ICMR ने राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

सुशांत जाधव
रविवार, 12 जुलै 2020

कोरोनाजन्य परिस्थितीसंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीवेळी चाचणीसह कोरोनावर उपयुक्त ठरत असलेल्या औषधाचा प्रयोग करताना सावधानता बाळगायला हवी, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना विषाणूच्या चाचणीसंदर्भात राज्यांना खास सल्ला दिलाय. कोणताही विचार न करता सरसकट कोरोना चाचणीचा सपाटा लावू नये. तसेच उपयुक्त ठरत असलेली औषधांचा प्रयोगही करु नका, असा सल्ला आयसीएमआरने दिलाय. ज्या रुग्णांची चाचणी करणे अत्यावश्यक असेल त्यांचीच चाचणी करावी. अन्यथा विनाकारण नुकसान होईल, असे आयसीएमआरने म्हटले आहे.  कोरोनाजन्य परिस्थितीसंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीवेळी चाचणीसह कोरोनावर उपयुक्त ठरत असलेल्या औषधाचा प्रयोग करताना सावधानता बाळगायला हवी, असेही म्हटले आहे.

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २५ आमदार दिल्लीत दाखल

मध्यम आणि गंभीर रुग्णांसाठी  पर्याप्त ऑक्सीजन व्यवस्था, एंटी-कोआगुलंट्स आणि कॉर्टिकोस्टेरॉयड्स किफायती दरात उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचेही आयससीएमआरने म्हटले आहे. कोरोनावरील प्रभावी उपचाराचा शोध सुरु असताना क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट नसलेल्या काही औषधांचा  पुन्हा पुन्हा वापर केला जात आहे.  केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच रेमडेसिवीर आणि टोसिलिजुमेब यासारख्या औषधांना परवानगी दिली आहे, याकडेही लक्ष वेधले.  

बारामतीत कोरोनाचे थैमान; एकाच दिवसात तब्बल...

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. सरकार आणि प्रशासन यासंदर्भात युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. मात्र तरीही देशातील आकडा दिवसागणिक वाढताना दिसतोय. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 8 लाखाहून अधिक झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी आहे. राज्यातील मुंबई-पुणे याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेत पुण्यामध्ये पुन्हा कडकडीत लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR tells states to avoid indiscriminate use of Coronavirus testing