Coronavirus : कोरोनाच्या लढाईत पोस्ट बजावणार महत्वाची भूमिका; आयसीएमआरसोबत करार

ICMR ties up with India post
ICMR ties up with India post
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता कोरोनाच्या लढाईत पोस्टही महत्वाची भूमिका बजावणार आहे. भारतातील सर्व भागांमध्ये आता चाचणी किटची डिलिव्हरी करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरने दररोज संपूर्ण देशात सुमारे १ लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. या महत्त्वपूर्ण कामात भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट महत्त्वाची भूमिका बजावणार असून पोस्ट आपल्या १६ प्रादेशिक ऑफिसमधून कोरोना चाचणीच्या किटची डिलिव्हरी करणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोस्टाने यासाठी आयसीएमआरबरोबर एक करारही केला आहे. देशातील आयसीएमआरने ठरवून दिलेल्या २०० अतिरिक्त लॅबसाठी भारतीय पोस्ट ऑफिस टेस्ट किट्सचा पुरवठा करणार आहे. या सर्व प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून पोस्ट ऑफिस आपल्या भव्य नेटवर्कसह पुन्हा एकदा कोरोना वॉरियर्स बनले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या निर्णयावर कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, आयसीएमआर आणि टपाल विभाग यांच्यातील या कराराचे मी स्वागत करतो. टपाल विभाग लोकांना पत्रे, औषधे, आर्थिक मदत यांसारख्या सुविधा देत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान, गरजूंना अन्न आणि रेशन देण्याचे देखील काम करीत आहे. अशा कठीण काळात आपले पोस्टमन देशाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

प्रत्येक देशात वेगळी पद्धत; कोणत्या देशात कसे होतात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

दरम्यान, करारानुसार टेस्टिंग किट पोस्टल विभागाच्या ऑफिसमध्ये येताच ती वेगवेगळ्या राज्यांच्या संबंधित प्रयोगशाळांमध्ये वेळेवर पाठवण्यात येणार आहेत. हे आगार १६ पोस्टल मंडळे किंवा राज्यांचं मिळून बनलेलं आहे. टपाल विभाग आणि आयसीएमएकडून या कामासाठी नोडल अधिका-यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. जेणेकरून वेळेवर टेस्टिंग किट पोहोचवता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com