esakal | UGC च्या अभ्यासक्रमातून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

बोलून बातमी शोधा

owesi

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर आपली हिंदुत्व विचारधारा पाठ्यपुस्तकामध्ये आणल्याचा आरोप केला आहे

UGC च्या अभ्यासक्रमातून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर आपली हिंदुत्व विचारधारा पाठ्यपुस्तकामध्ये आणल्याचा आरोप केला आहे.  विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) एक संवैधानिक संस्था आहे, जी विद्यापीठांमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जबाबदार असते. यूजीसीने नुकतेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा एक ड्राफ्ट प्रकाशित केला आहे. ज्यात भारतीय इतिहासातील अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यूजीसीच्या या नव्या ड्राफ्टवर अनेक नेत्यांसह बुद्धीजीवींनी आक्षेप घेतलाय. असुद्दीन ओवैसी त्यातील एक आहेत. त्यांनी पाठपुस्तकांमधून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन भाजप सरकारवर टीका केलीये.

बीए इतिहासाचा पहिला पेपर आयडिया ऑफ भारतवर आधारित आहे. यामध्ये भारतीय चालीरिती, भारतीय ज्ञान परंपरा, कला, साहित्य, धर्म, विज्ञान, जैन आणि बौद्ध धर्म साहित्य, भारतीय आर्थिक परंपरा या विषयांचा समावेश आहे. यामध्ये वेद, उपनिषद, ग्रंथ, वसुधैव कुटुंबकमची संकल्पना, भारतीय संख्या पद्धती, गणित, सागरी व्यापार अशा विषयांचाही यात समावेश आहे. ड्राफ्टमध्ये सांगण्यात आलंय, की यामुळे विद्यार्थ्यांना भारताची जुनी परंपरा, समाज याबद्दल ज्ञान होईल. तसेच समाज व्यवस्था, धर्म पद्धती, राजकीय इतिहास याबाबतचा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जाईल. पाठ्यपुस्तकामधून आर्यांनी आक्रमण केल्याची थेरी नाकारण्यात आली आहे. इतिहासांच्या पुस्तकांमध्ये बाबर आणि तैमूरं यांना आक्रमणकारी म्हणण्यात आलं. याआधीच्या पाठ्यपुस्तकांत त्यांना आक्रमणकारी म्हणण्यात आलं नव्हतं.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हिंदू संस्कृतीवर भर दिला गेला असल्याने याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला आहे. पाठ्यपुस्तकांमधून शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामागे आरएसएसचे षडयंत्र असल्याचा आरोप होताय. देशाचे भगवेकरण करण्याचा हेतू यामागे असल्याचा आरोप अनेक बुद्धीजीवींनी केला आहे. पाठ्यपुस्ताकातून मुस्लिम शासन काळाचं महत्त्व संपवले जात असल्याचाही आरोप होत आहे. सेक्युलर साहित्याऐवजी धार्मिक साहित्यांचे उदात्तीकरण करण्यात येत असल्याचा आरोप श्यामलाल कॉलेजचे प्रोफेसर जीतेंद्र मीणा यांनी केलाय.

असदुद्दीन ओवैसी यांनीही ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली. शिक्षण हे प्रोपॅगंडा नसते, भाजप नवा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हिंदुत्व विचारधारा आणू पाहात आहे. पाठ्यपुस्तकात धार्मिक ग्रंथांचा, संस्कृतीचा अभ्यास असावा पण त्याची मोडतोड होता कामा नये. मुस्लिम इतिहास संपवणे, 1875 च्या उठावापूर्वीचा अभ्यासक्रम पुसून टाकने, दलित राजकारण आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेहरु आणि पटेल यांच्यावरील लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ओवौसींनी केलाय.