Nagaland IED Blast: आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ IED ब्लास्ट! १ जवान शहीद, ४ जण जखमी; स्फोटानंतर मोठे सर्च ऑपरेशन

Nagaland IED Blast Assam Rifles: नागालँडमधील सुखोवीजवळ आसाम रायफल्सच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा संशयित स्फोट झाला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
Nagaland IED Blast Assam Rifles

Nagaland IED Blast Assam Rifles

ESakal

Updated on

नागालँडच्या सुखोई भागात आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ एक संशयित स्फोटक उपकरण (आयईडी) सापडल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाले आहेत. हा स्फोट नागालँडच्या चुमोकेदिमा भागात झाला. एका आठवड्यात आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ आयईडी स्फोटाची ही दुसरी घटना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com