esakal | "अतिरिक्त ऑक्सिजन असेल तर कृपया दिल्लीला द्या"; इतर मुख्यमंत्र्यांना केजरीवालांची विनंती

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal
"अतिरिक्त ऑक्सिजन असेल तर कृपया दिल्लीला द्या"; इतर मुख्यमंत्र्यांना केजरीवालांची विनंती
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आहे. "तुमच्याकडे अतिरिक्त ऑक्सिजन असेल तर कृपया दिल्लीला द्या," असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडे ते सातत्याने ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी करत आहेत.

केजरीवाल आवाहन करताना म्हणाले, "आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना विनंती करत आहोत की जर त्यांच्याकडे अतिरिक्त ऑक्सिजन असेल तर त्यांनी तो दिल्लीला द्यावा. या संकटात केंद्र सरकारही आमची मदत करत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे दिल्लीतील परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. त्यामुळे सर्व उपलब्ध साधनसामुग्री देखील अपुरी पडू लागली आहे"

हेही वाचा: लैंगिक संबंधांबाबत मदत मागताना भारतीयांमध्ये का निर्माण होते अपराधी भावना?

दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात नव्या रुग्णांची भरती बंद करण्यात आली आहे. बेडची संख्या देखील कमी करुन ७०० करण्यात आली आहे. रुग्णालये सातत्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं निर्माण झालेल्या संकटाशी लढत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी रुग्णालयांनी रुग्णांची नवी भरती बंद केली आहे. यापूर्वी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयानं १५० बेड कमी केले होते.

रुग्णालयांमध्ये नवी रुग्णभरती बंद

दिल्लीच्या सरोज रुग्णालयानं देखील नवीन रुग्णांना भरती करुन घेण बंद केलं आहे. तसेच जुन्या रुग्णांना डिस्चार्ज केलं जात आहे. रुग्णालयाच्या कोविड विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं की, "पाच दिवसांपासून आमचे कर्मचारी ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या शोधात आहेत. आता मात्र आम्ही थकलो आहोत त्यामुळे प्रयत्न करणं सोडून दिलं आहे. आमचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. आम्हाला आमच्या हिश्याची औषधं आणि ऑक्सिजन मिळालेले नाहीत, सरकार आम्हाला हे सर्व उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठऱलं आहे"