esakal | लैंगिक संबंधांबाबत मदत मागताना भारतीयांमध्ये का निर्माण होते अपराधी भावना?

बोलून बातमी शोधा

marriage date in marathi new years
लैंगिक संबंधांबाबत मदत मागताना भारतीयांमध्ये का निर्माण होते अपराधी भावना?
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भारतात 'सेक्स" हा शब्द जवळपास बदनाम म्हणूनच मानला जातो, त्यामागे अनेक कारण आहेत. शतकानुशतके लैंगिक संबंधांबद्दल कमी जागरुकता, घरगुती हिंसाचार, संमती नसणे आणि खोट्या कल्पना यांमुळे 'सेक्स' या शब्दाला निषिद्ध मानलं गेलं आहे. तसेच संस्कृती आणि संस्कारांच्या नावाखाली याला आणखीनच दाबण्याचं काम करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये लैंगिक संबंधांबाबत मदत मागताना अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती का होते याचं सविस्तर विवेचन 'सेक्स कोच' म्हणून काम करणाऱ्या पल्लवी बर्नवाल यांनी केलं आहे.

हेही वाचा: "कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण

पल्लवी बर्नवाल या स्तंभलेखक, लेखक आणि TEDEX स्पीकर आहे. त्या सेक्ससंबंधीची जवळीकता आपल्या आरोग्याबाबत महत्वाची भूमिका कशी बजावते हे समजावून सांगतात. यासाठी लोकशिक्षण, शब्दसंग्रह करण्याचं महत्वाचं काम त्या करत आहेत. नुकत्याच त्यांनी इंडियन एक्स्प्रेसोबतच्या मुलाखतीत सेक्स संबंधांबाबतच्या खोट्या गोष्टी काय आहेत. याबद्दलच्या लोकांच्या लज्जास्पद वाटणाऱ्या भावना कशा थांबवल्या पाहिजेत यावर मार्गदर्शन केलं.

हेही वाचा: केंद्राचा मोठा निर्णय; आयात होणाऱ्या लस, ऑक्सिजनवरील कर माफ

बर्नवाल म्हणाल्या, “भारतात लैंगिक संबंधांबद्दल जागरुकतेचा पूर्णत: अभाव आहे. त्याच्याशी जोडलेली 'कलंक' ही भावना त्यामागील प्रमुख कारण आहे. लैंगिक संबंधांना लज्जास्पद, घाणेरडं म्हणून पाहिलं जातं. याबद्दल बोलल्यास आपल्याला दोषी ठरवलं जाईल याची चिंता लोकांना असते. याबाबत उदाहरण देताना त्या सांगतात, मला लोकांकडून मेल व मेसेज येतात त्यात ते म्हणतात की, "आम्हाला तुमच्या पोस्टवर कमेंट करायची आहे पण आमचा बॉस किंवा कुटुंब आपल्याविषयी काय विचार करेल याची आम्हाला भीती वाटते"

नशिबाला दोष देत त्रास सहन करतात

कोरोना काळाच्या आधी बर्नवाल या लैंगिक शिक्षणाबाबत सामूहिक कार्यशाळा घेत होत्या. या कार्यशाळांमध्ये त्या लैंगिक संबंधांच्या मूलभूत गोष्टींबद्दल बोलत असतं. यामध्ये कधीकधी एखादा जोडीदार लैंगिक संबंधामधील परिस्थितीबद्दल काळजीत असल्यानं मदतीसाठी संपर्क साधत असे. यावरुन भारतात आता हळुहळू कोणत्याही प्रकारच्या समुपदेशन किंवा कोचिंगचा विचार केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. बरीच जोडपी अशी असतात त्यांना वाटते की विशिष्ट लैंगिक संबंधच आपल्या नशिबात आहे. यामुळे वर्षानुवर्षे ते शांतपणे हा त्रास सहन करत राहतात, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे.

सासरच्या लोकांचा हस्तक्षेपही ठरतो अडथळा

लैंगिक संबंधांबाबतच्या आणि नातेसंबंधांबाबतच्या समस्या घेऊन अनेक जोडपी बर्नवाल यांच्याकडे येतात का? या प्रश्नावर त्या सांगतात की, "होय हे प्रमाण दररोज वाढत आहे. यामध्ये बहुतेक जणांच्या समस्या या लैंगिक संबंधांबाबतच्या आहेत. मात्र, पूर्वी नातेसंबंधातील समस्यांबाबत लोक येत होते. जर नात्यात काही चांगलं घडलं तर लैंगिक संबंध वाढत जातात. बऱ्याच लोक, जवळीकतेशिवाय लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत. नातेसंबंध हे आव्हानांनी भरलेले असतात. यांमध्ये सर्वात सामान्य बाब म्हणजे सासरचा हस्तक्षेप. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात, सून आणि सासू यांच्यात असंतुलन असू शकते. काही परिस्थितींमध्ये, सर्व काही ठीक आहे. परंतू, एखाद्या वेळी लैंगिक संबंध गलिच्छ आहेत ते फक्त बाळ होण्यासाठीच गरजेचे आहेत अशी भावना निर्माण झाली जोडीदाराची लैंगिक उपासमार होत राहते"