
भारत-पाकिस्तान फाळणी रद्द करा, म्हणजे हिंदु-मुस्लीम आरामात...; शंकराचार्यांची मागणी
नवी दिल्ली - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी सोमवारी अजब विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. 'आपल्यापासून विभाजीत झालेला पाकिस्तान देश आता आपला शत्रू कसा बनला, असा सवाल अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी केला आहे. (indo-pak partition news in Marathi)
स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज म्हणाले की, 'मुस्लिमांनी आमच्यापासून फारकत घेऊन पाकिस्तानची निर्मिती केली, पण तरीही अनेक मुस्लिम भारतात राहिले. आता एकतर येथील मुस्लिमांनीही पाकिस्तानात जावे किंवा भारत-पाकिस्तान फाळणी रद्द करावी. स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज म्हणाले की, फाळणीमुळे अखंड भारतातील अनेक धार्मिक स्थळे बांगलादेश आणि पाकिस्तानात गेली आहेत.
दरम्यान दोन्ही देशांचे विभाजन अपयशी असेल, तर ते रद्द करणे योग्य ठरेल. मग हिंदू आणि मुस्लिम सर्वांना एकाच देशात आरामात राहता येईल. केवळ धर्माच्या आधारवर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्याचं अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं.
सोमवारी जबलपूरमध्ये दाखल झालेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे जनतेने पूर्ण आदराने स्वागत केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी घरांवर आणि छतावर उभ्या असलेल्या लोकांनी मंगलगायन केलं.