जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम खान यांच्यावर टीका करताना अमरसिंह म्हणाले, 'सध्या #MeToo अभियान सुरू आहे. जयाप्रदा या जर पोलिस चौकीत गेल्या अन् त्यांनी #MeToo म्हटले तर आझम खान जेल रोड निवासस्थानावरुन थेट कारागृहात जातील.'

'नागरिकांना इंधनाच्या दराची काळजी आहे. परंतु, इंधन हे मोदींच्या घरून येत नाही तर बाहेरील देशातून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे कमीतकमी हिंदू मुली सुरक्षित आहेत. आमच्या हिंदू मुलींवर अत्याचार होत होते, त्यावेळी आझम खान सारख्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यापासून रोखले होते. मी, मुस्लिमांच्या विरोधात नाही. आम्हीसुद्धा डॉ. अब्दुल कलामसारख्या व्यक्तींचा सन्मान करतो. पण, भारतात राहून पाकिस्तानची स्तृती करणाऱयांच्या विरोधात आम्ही आहोत. अशा लोकांना येथे जागा नाही, त्यांनी सरळ निघून जावे,' असेही अमरसिंह म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if jaya prada says #MeToo then sp leader azam khan will be go in jail says mp amar singh