भाजप नेते म्हणतात, 'आदेश आल्यास कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू'

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

- कर्नाटकात भाजपने केलेले 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाल्याने आता मध्य प्रदेश राज्यात भाजप राजकीय खेळी करण्याची तयारीत.

नवी दिल्ली : आमच्या वरच्या पातळीवरील 1 आणि 2 क्रमांकावरील नेत्यांनी आदेश दिला तर कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही, असा दावा मध्य प्रदेशातील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी आज (बुधवार) केला. 

गोपाल भार्गव हे मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी याबाबतचे वक्तव्य केेले आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार पाडल्याने भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकनंतर आता मध्य प्रदेशकडे भाजप नेत्यांनी लक्ष्य केले. 

दरम्यान, कर्नाटकात भाजपने केलेले 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाल्याने आता मध्य प्रदेश राज्यात भाजप काय राजकीय खेळी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If order comes Kamal Nath government will be demolished in 24 hours says BJP leader