esakal | हिस्ट्रीशीटर विकास दुबेसोबत पोलिसांची एक चूक पडली महागात, आठ जण झाले हुतात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

vikas_dube

उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या झाली होती. या प्रकरणी आरोपी असलेला हिस्ट्रीशीटर विकास दुबे याचा पोलिस शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे.

हिस्ट्रीशीटर विकास दुबेसोबत पोलिसांची एक चूक पडली महागात, आठ जण झाले हुतात्मा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कानपूर- उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या झाली होती. या प्रकरणी आरोपी असलेला हिस्ट्रीशीटर विकास दुबे याचा पोलिस शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. मात्र, पोलिसांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले असते तर आज वर्दीचा रंग लाल झाला नसता, अशी चर्चा सुरु झाली आहे.

19 वर्षांपूर्वी विकास दुबे याने राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची पोलिस स्टेशनमध्ये घुसून हत्या केली होती. दुबेने पोलिसांसमोर शुक्ला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, खुद्द पोलिसांनी दुबे विरोधात साक्ष दिली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती. आता याच दुबेने एका पोलिस उपअधीक्षकासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. तर सात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

खूशखबर! आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा
विकास दुबेची तत्कालीन राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्यासोबत शत्रुता होती. शुक्ला त्यावेळी काही कारणास्तव पोलिस स्टेशनमध्ये आले होते. यावेळी दुबेने आपल्या साथीदारांसह पोलिस स्टेशनमध्ये घुसून धुडघूस घातला. दुबेने शुक्ला यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. सहा महिन्यानंतर त्याने स्व:ला सरेंडर केलं. प्रकरण न्यायालयात गेलं, पण दुबेने आपली राजकीय ओळख आणि दहशतीच्या जोरावर साक्षीदारांना धमकावणे सुरु केले. काहींना पैसे देऊन गप्प केले. पोलिसांनीही दुबेविरोधात साक्ष दिली नाही. त्यामुळे त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत आणि त्याला न्यायालयाने निर्दोष सोडून दिले. ही 2001 सालची घटना आहे.

संतोष शुक्ला यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश

पोलिसांनी आपली भूमिका योग्यपणे निभावली असती तर आज दुबे याला न्यायालयाकडून शिक्षा झाली असती, असं मृत शुक्ला यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. संतोष शुक्ला यांचे भाऊ मनोज शुक्ला यांनी यावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या भावाला न्याय मिळू शकला नाही. आता विकास दुबेचे हात वर्दीवाल्यांच्या रक्ताने रंगले आहेत. पोलिस विभागाने आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हत्येचा बदला घ्यावा, असं केलं तर मी माझ्या भावाला न्याय मिळाला असं समजेन, असं ते म्हणाले आहेत.

ते पोलिस ओरडून सांगत होते, आम्हाला जीवे मारुन तुम्ही वाचणार नाही!
विकास दुबेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

2000 मध्ये कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्येप्रकरणातही त्याच्यावर आरोप झाले होते. याचवर्षी रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे याची हत्या झाली होती. यातही विकास दुबेचा हात असल्याचे बोलले जाते. 2013 मध्ये त्याच्यावर गंभीर आरोप झाले.  विकास दुबे याच्या विरोधात 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.

loading image