Omicron Updates : देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Variant Effect on Asia Country

देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्णांची संख्या महाराष्ट्रात नोंदविण्यात आली आहे.

देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नव्याने आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) आता जगभरासह भारतातदेखील (Omicron cases in India) आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देशातील ओमिक्रोन बाधितांची संख्या १७०० वर पोहोचली आहे.

देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात नोंदविण्यात आली असून येथे ५१० ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्लीची नोंद करण्यात आली आहे. येथे ३५१ ओमिक्रॉन बाधितांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. देशाच्या इतर भागातदेखील ओमिक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. (Omicron variant In India Latest News In Marathi)

भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 1431 च्या घरात

भारतातील ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची आकडेवारीत सातत्याने वाढ असून यामध्ये महाराष्ट्र – 510 , दिल्ली – 351, गुजरात – 136, तेलंगणा – 67, केरळ – 156 , तामिळनाडू – 121 , कर्नाटक – 64, राजस्थान – 120 , ओडिसा – 37, आंध्र प्रदेश – 17, जम्मू-काश्मीर – 03, पश्चिम बंगाल –20, उत्तर प्रदेश – 08, चंदीगड – 03, लदाख – 01, उत्तराखंड – 08, गोवा - 01, मध्य प्रदेश - 09, हिमाचल प्रदेश - 01, मणिपूर - 01, अंदमान-निकोबार - 02, हरियाणा - 63, पंजाब एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. (India Omicron State wise cases number )

ताप अन् घसादुखी असलेल्यांची कोरोना टेस्ट करा; केंद्राचे निर्देश

ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने ताप आणि घसादुखी (fever And Sore Throat) असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचाणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड टेस्ट (Corona Rapid Antigen Test) जलद करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. केंद्राने राज्यांना (Center Government Letter To All States ) पत्र लिहून कोरोनाचा वाढता संसर्गाचा दर पाहता रॅपिड अँटीजेन टेस्टचा (RAT) वापर वाढवण्यास सांगितले आहे.

वॉर रूम सज्ज करण्याच्या केंद्राच्या सूचना

देशातील वाढत्या ओमिक्रॉन (Omicron) रूग्णसंख्येमुळे केंद्र आणि विविध राज्यांकडून खबरदारीच्या सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Omicron omicron 3 times more transmissible than delta) यापूर्वी आलेल्या डेल्टापेक्षा (Delta Variant) गंभीर असून याचा संसर्ग तिप्पट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी वॉर रूम (War Room For Omicron) पुन्हा सक्रीय करा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा: ओमिक्रॉनमुळे राज्यात नाईट कर्फ्यू लागू; वाचा नवी नियमावली

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

कोविड काळात ताप, खोकला, थकवा, वास आणि चव जाणे, अशा लक्षणांबद्दल सर्व लोकं जागरूक आहेत. पण ओमिक्रॉन प्रकारतील लक्षणे वेगळी आणि अधिक असामान्य असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. ओमिक्रॉन प्रकार सापडलेल्या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, लोकांमध्ये 'सौम्य' लक्षणे आढळून येत आहेत. काहींनी ताप येण्याची तक्रार केली आहे. काहींना घसादुखी, थकवा आणि अंगदुखी अशी लक्षणे आढळली आहेत. मात्र, रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या यापूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी असल्याचे दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर अनबेन पिल्ले म्हणाले की रात्री खूप घाम येत असल्यास ते लक्षण नवीन ओमिक्रॉन प्रकारामधील असू शकते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लागण झालेल्या रूग्णांना ताप, थंडी, अंगदुखी, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी प्राथमिक लक्षणे दिसून आली होती. तर काही जणांमध्ये यापैकी कुठलीच लक्षणं दिसून आली नव्हती, म्हणजेच ते असिमटिमॅटिक होते. (Omicron Latest News In Marathi)

Web Title: Omicron Variant Daily Count In India Delhi Maharshtra Latest Breaking News Updates Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top